पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ( Tarapur Industrial Estate ) केंबोंड केमिकल या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली ( Chembond Chemical Factory Fire ) आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले ( Tarapur Chemical Factory Fire ) आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला ( Worker Died In Chembond Factory Fire ) आहे.
अचानक लागली आग : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन नाका परिसरातील प्लॉट नंबर E-6/3 व E-4 मध्ये असलेल्या केंबोंड केमिकल या कंपनीत सकाळी दहा वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यामुळे भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या व बोईसर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
एका कामगाराचा मृत्यू : अग्निशमन दल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कंपनीतील कामगारांना कंपनीबाहेर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत कंपनीतील प्रोडक्शन मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. दुलेश पाटील असे मृतकाचे नाव असून, ते सफाळे येथील रहिवासी आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान कंपनीला लागलेल्या या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा : Video : लोटे एमआयडीसीतील प्रिवी कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग