ETV Bharat / state

धक्कादायक...! पोटच्या तीन मुलांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या; नालासोपाऱ्यातील प्रकार - father killed three children nalasopara

नालासोपारा पुर्वेच्या डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा येथे कैलास परमार रहात होता. मृत कैलास परमार यांची पत्नी गेल्या दीड महिन्यापासून माहेरी गेली होती. यानंतर तो ३ मुलांसह एकटा राहत होता. येथून काही अंतरावर त्याचे वडीलही राहतात. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास वडील विजू परमार यांनी कैलासला चहा पिण्यासाठी फोन केला. तेव्हा मी झोपलो आहे, असे उत्तर कैलासने दिले.

Father commits suicide by killing three children in nalasopara thane
पोटच्या तीन मुलांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या (प्रतिकात्मक)
author img

By

Published : Jun 28, 2020, 12:07 AM IST

Updated : Jun 28, 2020, 5:45 AM IST

नालासोपारा/ ठाणे - एका व्यक्तीने आपल्या तीन लहान मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नालासोपारा पूर्वेच्या डॉन लेन परिसरात शनिवारी रात्री घडली. कैलास विजू परमार (35), मुलगा नयन परमार (12), मुलगी नंदिनी परमार (7) आणि नयना परमार (3) अशी मृतांची नावे आहेत.

धक्कादायक...! पोटच्या तीन मुलांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या; नालासोपाऱ्यातील प्रकार

नालासोपारा पुर्वेच्या डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा येथे कैलास परमार रहात होता. मृत कैलास परमार यांची पत्नी गेल्या दीड महिन्यापासून माहेरी गेली होती. यानंतर तो ३ मुलांसह एकटा राहत होता. येथून काही अंतरावर त्याचे वडीलही राहतात. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास वडील विजू परमार यांनी कैलासला चहा पिण्यासाठी फोन केला. तेव्हा मी झोपलो आहे, असे उत्तर कैलासने दिले. यानंतर सायंकाळी विजू परमार हे त्याच्या घरी पोहोचले. यावेळी तेव्हा दार उघडत नसल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली.

आजूबाजूला असलेल्या लोकांनी मिळून दरवाजा उघडला असता त्यावेळेस रक्तबंबाळ अवस्थेत ४ मृतदेह आढळून आले. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने नंदिनी (7), नयना (३) आणि नयन (१२) या तीन मुलांची चाकूने गळा चिरून हत्या केली. यानंतर त्यांने स्वत:वरही चाकूने वार करून आत्महत्या केली. यामागे कौटुंबिक किंवा आर्थिक कारण आहे का? त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

स्थानिकांनी घटनेची महिती तुलिंज पोलीस ठाण्याला दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन केंद्रात पाठवण्यात आले. मृत कैलास परमार यांनी कौटुंबिक वादामुळे ३ पोटच्या मुलांना गळा चिरून हत्या करून स्वतःचे ही जीवन संपवले.

मृत कैलास यांचे वडील विजू परमार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा तपास सुरु आहे, अशी माहिती पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिली.

Last Updated : Jun 28, 2020, 5:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.