वसई-विरार (पालघर) - पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वसई-विरारमध्ये सोमवारी १८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. या नवीन रुग्णांसह या शहरांतील बाधितांची संख्या २२४ झाली आहे.
नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये सात जण नालासोपारा पूर्वेकडील आहेत. यापैकी चार रुग्ण हे एका बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील आहे. या रुग्णांना महापालिकेच्या वसई पुर्वेकडील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर इतर तीन रुग्णांपैकी एक दोन रुग्ण हे मुंबईतील रुग्णालयातील कर्मचारी आहेत. या रुग्णांवरही उपाचार सुरू आहेत. तर एक ५० वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर नालासोपारा पश्चिमेकडिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विरार पश्चिमधून चार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी एक रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. दुसरा रुग्ण एका खासगी कंपनीमधील कर्मचारी (तारतंत्री) आहे. रुग्णास उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेकडिल रुग्णालयात दाखल केले आहे. तिसरा रुग्ण हा वृत्तवाहिनीचा कर्मचारी आहे. रुग्णास उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेकडिल रुग्णालयात दाखल केले आहे. तर १ वर्षांच्या मुलीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ही मुलगी कोरोना रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील आहे.
वसई पूर्वेमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५७ वर्षीय पुरुष मुंबईत हॉस्पीटलचा कर्मचारी (लॅब टेक्नीशीयन)आहे. रुग्णास मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दुसरा रुग्णदेखील मुंबई येथील अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी आहे. रुग्णास मुंबई मधील आयसोलेशन वॉर्ड मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
विरार पूर्वमध्ये तीन बाधीत रुग्ण आढळले आहेत. एक रुग्ण वृत्तवाहिनीचा कर्मचारी आहे. रुग्णास उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेकडिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दुसरा रुग्ण मुंबईतील धारावी या ठिकाणी फुड डिस्ट्रीबुटर आहे. तर तिसरा रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
दरम्यान, नालासोपारा पश्चिमेत दोन रुग्ण सापडले. पहिला रुग्ण मुंबई येथील घनकचरा विभागातील कर्मचारी आहे. तर एका ८ वर्षाच्या कॅन्सर ग्रस्त मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.
सोमवारी वसई विरारमध्ये एकूण २० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. उपचारानंतर रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. परिसरात आतापर्यंत १२५ रुग्ण बरे झाले आहेत. तर मृतांची संख्या नऊ आहे.