पालघर - येथे नियंत्रण सुटल्याने तीन चाकी टेम्पो उलटून त्यामधील अंड्यांचा अक्षरश: चुराडा झाल्याची घटना घडली. आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास विरार पश्चिम येथे ही घटना घडली. या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, त्याचे पन्नास हजाराहून अधिक मालाचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा- #HyderabadEncounter: 'त्या' चौघांचा कर्दनकाळ ठरलेला 'एन्काऊंटर मॅन' आहे तरी कोण..
आज दुपारी विरार पश्चिम बोळींज-आगाशी मार्गावरून अंड्याने भरलेला तीन चाकी टेम्पो जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो भरकटला व रस्त्याच्या मधोमध उलटला. टेम्पोतील दहा हजाराहून अधिक अंड्यांचे ट्रे खाली पडून त्यातील अंडी फुटली. अंडी फुटल्याने संपूर्ण रस्ताभर अंड्याचा बलक पसरून चिखल झाला होता. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाॅटर टेंडरनी रस्ता धुतल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.