पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी एका शिक्षकाच्या बदली प्रस्तावासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र सदर शिक्षकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तक्रार केली केली. तत्पुर्वी त्यांच्यात तडजोडी अंती 25 हजार रुपये लाच देण्या बाबत ठरले.नंतर बोईसर- पालघर रोडवरील एका गृहसंकुलातील सदनिका परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यात शिक्षणाधिकारी लता सानप यांना तक्रारदार शिक्षकाकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले व अटक केली.
हेही वाचा : नागपुरात अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, प्रियकरासह तिघे अटकेत