पालघर /विरार - वसई विरारमध्ये शुक्रवारी सकाळपासून विविध ठिकाणी ईडीचे धाडसत्र सुरू आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरारमधील नामांकित विवा ग्रुपची ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू करण्यात आली आहे. विरार पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील विवा सुपर मार्केटमधील विवा ग्रुपच्या कार्यालयात ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
ठाकूर यांच्या कार्यालया बाहेर सीआरपी तैनात करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीवरून HDIL कंपनीचे मालक राकेश वाधवान यांनी ईडीच्या चौकशीत दिलेली माहिती खरी आहे का? विवा ग्रुपचा यात काय संबंध आहे? याबाबतची सर्व सत्यता पडताळण्यासाठी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हेही वाचा - नाशिक महानगरपालिका कार्यालयाला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल