पालघर- सतत भूकंपाचे सौम्य धक्के बसणारे पालघर पुन्हा हादरले आहे.जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. रात्री 10 वाजून 45 सेकंदांच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला आहे.
तलासरी तालुक्यातील अच्छाड, धुंदलवाडी, आंबोली, बहारे या भागात त्याचप्रमाणे डहाणू तालुक्यातील कासा, सुर्यानगर, धानीवरी, ऊर्से या भागात जाणवल्याची माहिती नागरिकांना दिली आहे. या कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पालघर आपत्ती व्यवस्थापन कार्यलायामार्फत मिळाली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाच्या धक्क्यांचे हे सत्र शमले होते. मात्र आज पुन्हा हा भूकंपाचा धक्का बसल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 2018 पासून जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात सुरू असलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे आजवर या परिसरातील अनेक घरांना तडे गेले असून घरांचे नुकसानदेखील झाले आहे.
हेही वाचा-पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का; 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
7 ऑक्टोबर 2020 लाही बसले होते भूकंपाचे धक्के-
जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. तर भूकंपाचे केंद्रबिंदू गंजाड आणि धुंदलवाडी दरम्यान आठ किलोमीटर खोलीवर होते. भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नव्हती. ऑक्टोबरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेक घरांना तडे गेले असल्याने घरांचे नुकसानदेखील झाले होते.
हेही वाचा-पालघर- डहाणू व तलासरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सप्टेंबर 2020 मध्ये बसले भूकंपाचे धक्के
जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार रात्री तीन भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता 3.5, 2.1, 2.0 रीश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. डहाणू, कासा, धुंदलवाडी, चिंचले, तलासरी व आसपासच्या परिसरात परिसरात हा भूकंपाचे धक्के जाणवले होते.