ETV Bharat / state

Heavy Rain in Palghar : परतीच्या पावसामुळे वयोवृध्द दाम्पत्याचा संसार उघड्यावर ; घर कोसळून मोठे नुकसान - वयोवृद्ध दांम्पत्याचा संसार उघड्यावर

पालघरमधील (Heavy Rain in Palghar) वाढीव भागात वयोवृध्द दाम्पत्याचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांचे या पावसामुळे घर कोसळून मोठे नुकसान झाले (house collapse in Vadhiv village of elderly couple) आहे.

Heavy Rain in Palghar
परतीच्या पावसामुळे वयोवृध्द दाम्पत्याचा संसार उघड्यावर
author img

By

Published : Oct 14, 2022, 12:34 PM IST

पालघर : सध्या राज्यात काही भागात परतीचा पाऊस कोसळत (Heavy Rain in Palghar) आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. परतीच्या पावसानं अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांत शेती पिकांचं नुकसान झालं आहे. पालघरमध्ये, मात्र या परतीच्या पावसाने पालघरमधील वाढीव भागात वयोवृध्द दाम्पत्याचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांचे या पावसामुळे घर कोसळून मोठे नुकसान झाले (house collapse in Vadhiv village of elderly couple) आहे.

Heavy Rain in Palghar
परतीच्या पावसामुळे वयोवृध्द दाम्पत्याचा संसार उघड्यावर

वयोवृध्द दाम्पत्याचा संसार उघड्यावर - पालघर तालुक्यातील वैतरणा जवळील वाढीव गावातील पद्माकर पाटील यांच्या घराच्या शेजारीच असणाऱ्या पडीक घराची भिंत परतीच्या पावसामुळे कोसळली. त्यांच्या राहत्या घराचे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे वयोवृध्द दाम्पत्याचा संसार उघड्यावर आला (life of elderly couple exposed) आहे.

गाढ झोपेत असतानाच कोसळले घर - वाढीव गावातील वयोवृध्द असणारे पद्माकर पाटील व त्यांची पत्नी पहाटे गाढ झोपेत होते. गुरुवारी पहाटे साडेसहा वाजता परतीच्या पावसामुळे त्यांच्या घराच्या बाजूलाच असणाऱ्या पडीक घराची भिंत राहत्या घरावर कोसळली. यात पाटील व त्यांची पत्नी बचावले असून राहत्या घरावरील पत्रे, भिंत, टिव्ही यांच्यासह अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच केळवा सागरी पोलीस यांच्यासह तलाठी किरण जोगदंड, ग्रामसेवक महेश किणी आणि घटनास्थळी जावून पाहणी केली. घराच्या व अन्य वस्तूंच्या नुकसानीचा त्यांनी पंचनामा केला असता, यात एकूण ८० हजारांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई लवकर मिळावी अशी मागणी पद्माकर पाटील यांनी केली (house collapse in Vadhiv village) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.