ETV Bharat / state

वसई समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फीनचा कळप; पर्यटकांच्या मोबाईलमध्ये दृश्य कैद - डॉल्फिन

आता वसईकरांनाही यापुढे डॉल्फिन पाहण्यास मिळणार आहे. खोल समुद्रात आढळणारे डॉल्फिन वसईच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

डॉल्फीन
author img

By

Published : Feb 13, 2019, 11:48 PM IST

वसई - डॉल्फिन मासा उड्या मारताना बघण्यासाठी पर्यटक पैसा खर्च करून भरपूर प्रवास करायला तयार असतात. मात्र, डॉल्फिन कळपाने पोहत असल्याचे काही दिवसांपूर्वी वसईतील २ नशीबवान युवकांना राजोडी समुद्र किनारी ७ ते ८ डॉल्फिन मासे मजेत विहार करताना मोफत बघायला मिळाले. यावेळी स्थानिक तटरक्षक युवकांनी स्पीड बोटच्या मदतीने डॉल्फिनचे दृश्ये मोबाईलमध्ये चित्रीत केली आहेत.

समुहाने राहणारे डॉल्फिन वसईतील समुद्रातदेखील समुहानेच पाण्यातून उड्या मारताना दिसले. नरीमन पॉईन्टजवळच्या समुद्रातही काही दिवसांपूर्वी डॉल्फीन मासे बघायला मिळाले होते. मात्र, आता वसईकरांनाही यापुढे डॉल्फिन पाहण्यास मिळणार आहे. खोल समुद्रात आढळणारे डॉल्फिन वसईच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतात गोड्या पाण्यात डॉल्फिन आढळतात. मुंबई, पालघर, डहाणू नजीकच्या समुद्रात आतापर्यंत जे डॉल्फिन आढळले आहेत ते मृतावस्थेत होते. मात्र, वसईच्या राजोडी समुद्र किनारी डॉल्फिन दिसल्याने समाधानाचे वातावरण आहे.

वसई समुद्रकिनारी आलेले हे डॉल्फिन किती काळ राहतील? याबद्दल माहित नाही. मात्र, त्यांना पाहण्यासाठी गर्दी कायम असल्याचे वसईकर सांगतात.

Intro:वसईत दिसला डॉल्फिनचा कळप

प्रतिनिधी, वसई :

डॉल्फिन मासा उड्या मारताना बघायला मिळणं यासाठी लोकं पैसा खर्च करायला आणि भरपूर प्रवास करायला तयार असतात, मात्र डॉल्फिन कळपाने पोहत असल्याचे काही दिवसांपूर्वी वसईतील दोन नशीबवान युवकांना मोफत बघायला मिळालं. येथील राजोडी समुद्र किनारी ७ ते ८ डॉल्फिन मासे मजेत विहार करताना बघायला मिळाले, यावेळी स्थानिक तटरक्षक युवकांनी स्पीड बीटीच्या मदतीने डॉल्फिनचे दृश्यं मोबाईलमध्ये चित्रीत केली आहेत.Body:समुहाने राहणारे डॉल्फिन वसईतील समुद्रातदेखील समुहानेच पाण्यातून उड्या मारताना दिसले. नरीमन पॉईन्टजवळच्या समुद्रातही काही दिवसांपूर्वी डॉल्फीन मासे बघायला मिळाले होते मात्र आता वसईकरांनाही यापुढे डॉल्फिन पाहण्यास मिळणार असल्याचे आश्चर्य आहे. खोल समुद्रात आढळणाऱ्या डाॅल्फिन वसईच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतात गोड्या पाण्यातले डॉल्फिन आढळतात. मुंबई,पालघर,डहाणू नजीकच्या समुद्रात आतापर्यंत जे डॉल्फिन आढळले आहेत ते मृतावस्थेत होते अशा घटना घडल्या आहेत. मात्र वसईच्या राजोडी समुद्र किनारी डाॅल्फिन दिसल्याने समाधानाचे वातावरण आहे.Conclusion:वसई समुद्रकिनारी आलेले हे डॉल्फिन किती काळ राहतील याबद्दल माहित नाही मात्र, त्यांना पाहण्यासाठीची गर्दी कायम असल्याच्या प्रतिक्रिया वसईकर व प्राणी प्रेमींमधून उमटत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.