पालघर - कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वकाही बंद असल्यामुळे माणसांची वर्दळ पूर्णपणे कमी झाली असून प्रदूषण देखील कमी झाले आहे. सगळीकडे शांततेचे सूर अनुभवायला मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारचे पशु-पक्षी शहर परिसरात तसेच समुद्रकिनारे देखील स्वच्छ आणि शांत झाले असून दुर्मिळ मासे देखील समुद्र-खाडी परिसरात मुक्त विहार करू लागले आहेत. वैतरणा खाडीत सध्या कधीही न दिसणाऱ्या डॉल्फिन माशांचा वावर पहावयास मिळत आहे. वैतरणा येथील एका मच्छीमाराने डॉल्फिनच्या या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत.
वैतरणा खाडीत डॉल्फिनचा वावर कॅमेऱ्यात कैद - news about corona virus
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात प्रदूषण कमी झल्यामुळे वैतरणा खाडीत डॉल्फिनचा वावर सुरू झाला आहे.
![वैतरणा खाडीत डॉल्फिनचा वावर कॅमेऱ्यात कैद Dolphin fish seen in Vaitarna Bay](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6941547-1079-6941547-1587829789416.jpg?imwidth=3840)