ETV Bharat / state

पालघरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सामान्य जनतेला खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेता येत नसल्याने, उपचाराभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पालघरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारावे, व या कोविड सेंटरसाठी खासदार, आमदारांनी स्थानिक विकास निधीतून पैसे द्यावेत अशी मागणी भाजपा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी केली आहे.

पालघरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी
पालघरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी
author img

By

Published : Apr 21, 2021, 10:49 PM IST

Updated : Apr 22, 2021, 1:08 AM IST

पालघर - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सामान्य जनतेला खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेता येत नसल्याने, उपचाराभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पालघरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारावे, व या कोविड सेंटरसाठी खासदार, आमदारांनी स्थानिक विकास निधीतून पैसे द्यावेत अशी मागणी भाजपा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी केली आहे.

पालघरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी

पालघर जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर उभारावे अशी मागणी पुढे येत आहे. या जम्बो कोविड सेंटरसाठी खासदार, आमदारांनी त्यांना मिळणाऱ्या विकास निधीतून मदत करावी. एडवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारले जावे, व त्यासाठी जिल्ह्यातील 6 आमदारांनी प्रत्येकी 50 लाखांची मदत करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी

पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. दरदिवशी शेकडो रुग्णांची भर पडत आहे. रुग्ण वाढीचा भडका उडाल्याने रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. आरोग्यव्यवस्था कोलमडून पडली आहे. एकीकडे वाढत असलेली रुग्ण संख्या व दुसरीकडे उपचारासाठी रुग्णांची होत असलेली फरफट थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन हतबल होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करावी अशी मागणी होत आहे

कोविड सेंटरला व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याची मागणी

जिल्ह्यात दररोज चारशे ते पाचशे नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता लागत आहे. मात्र जिल्ह्यात या सर्व सुविधांची कमतरता आहे. वाडा तालुक्यातील पोशेरी कोविडसेंटरमध्ये औषधांचा पुरवठा करावा, डॉक्टरांची उलब्धता करून द्यावी, व्हेंटिलेटरचा पुरवठा करावा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Last Updated : Apr 22, 2021, 1:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.