पालघर - शिवसेना पक्षप्रमुखांनी आमचं सरकार आले की, सातबारा कोरा करू, अशी घोषणा निवडणूक पूर्वी केली होती. आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सात बारा कोरा करून लवकरच शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी लवकरात-लवकर सातबारा कोरा करावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - भाजप नेत्यांनी देशातील संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे - उदय सामंत
राज्यातील ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. वेळ पडली तर बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प रद्द करावा आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरे पर्यावरणाबाबत संवेदनशील, त्यामुळे पुण्याच्या टेकड्या वाचतील - नीलम गोऱ्हे
भाजीपाला असो की भात पीक अडत्यांकडून किंवा व्यापारी वर्गाकडून कमी दराने खरेदी करण्यात येते. त्यामुळे शेतकरीवर्गाचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यात सरकार तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाकरे सरकारने सरसकट सात-बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.