पालघर - कोरोना काळात लांब पल्ल्याची रेल्वे सेवा अजूनही बंद असून उपनगरीय रेल्वे सेवा तीन महिन्याच्या खंडानंतर सुरू झाली आहे. रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असली तरीही यंदाच्या वर्षी रेल्वे अपघातात 51 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या वैतरणा पुलापासून ते बोर्डी-उंबरगाव या राज्यातील सीमावर्ती भागापर्यंत यंदा हे 51 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या भागात ऑगस्टमध्ये एकही व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला नसून, सप्टेंबर महिन्यात मात्र 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2018 मध्ये 122 मृत्यू व 2019 मध्ये 209 मृत्यू झाले होते, 1 ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 51 मृत्यू झाले आहेत, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.
रेल्वे अपघातातील मृतांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर; 1ऑक्टोबरपर्यंत 51 मृत्यूची नोंद - पालघर रेल्वे अपघात मृत्यूची संख्या बातमी
मृतदेह ठेवण्यासाठी शवागार सेवा उपलब्ध नसून पालघर रेल्वे स्थानकात एका सामाजिक संस्थेने एक शवपेटी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मृतांची लवकरात लवकर ओळख पटवून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यास पोलीस प्रयत्नशील असतात. असे असले तरीही बेवारस मृतांच्या संख्या देखील लक्षणीय आहे. 2018 मध्ये 32 बेवारस मृतदेह, 2019 मध्ये 34 बेवारस मृतदेह तर यावर्षी 15 बेवारस मृतदेह रेल्वे पोलिसांनी दफन केले आहेत.