ETV Bharat / state

डहाणू तालुक्यात परतीच्या पावसाने भात पिकांचे नुकसान - Damage of paddy crops due to rains

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पालघरच्या डहाणू तालुक्यातील सागरी, डोंगरी आणि नागरी भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. यावेळी भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

damage-of-paddy-crops due to rains-in dahanu
author img

By

Published : Nov 3, 2019, 4:34 AM IST

पालघर - शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डहाणू तालुक्यातील सागरी, डोंगरी आणि नागरी भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. यावेळी भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

डहाणू तालुक्यात परतीच्या पावसाने भात पिकांचे नुकसान

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डहाणूमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खाचरात कापलेले पीक पाण्यात भिजुन तरंगू लागले होते. ते चिखलातून काढताना शेतकऱ्यांची दमछाक झाली. मात्र इतके करूनही किती पीक वाचवता येईल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून गोळीबार, वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ

पालघर जिल्ह्यात भात पीक क्षेत्र ७६५०० हेक्टर असून त्यात ९३%लागवड झाली आहे. ६१३०८ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र डहाणू तालुक्यातील आहे. मात्र,या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे .भात कापल्यावर काही दिवस रिमझिम पाऊस होता त्यामुळे आर्द्रतेचे वातावरण निर्माण झाले आणि भात शेतातील कडपावर रुजला.

परंतु शेतातील भाताला दोन ते तीन वेळा उन्हं दाखवले तरी या भातापासून मिळणारा तांदूळ हा खराब प्रतीचा असण्याची शक्यता असणार आहे. कृषी विभाग आपल्या त्रिस्तरीय समितीमार्फत (तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक) नुकसानीचे पंचनामे करीत आहे. तसेच वीमाधारक शेतकऱ्यांचे विमा प्रतिनिधीमार्फत पंचनामे सुरू आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . त्यात पावसामुळे चारादेखील काळा पडून त्याला कुबट वास येत असल्यामुळे जनावरे खाणार नाहीत असे या शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Intro:डहाणू तालुक्यातही परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान
Body:डहाणू तालुक्यातही परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान

पालघर/ डहाणू 2 नोव्हेंबर
चक्रीवादळाच्या प्रभावाने शुक्रवारी रात्री  डहाणू तालुक्यातील सागरी, डोंगरी आणि नागरी भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे खाचरात कापले पीक पाण्यात भिजले, ते काढण्याकरिता शेतकरी कुटुंबाला जीवापाड मेहनत करावी लागली. मात्र ते करूनही किती पीक वाचवता येईल याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली.
गरवे आणि निमगरवे भात कापणी सुरू असताना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने  कापलेले भात खाचरातील पाण्यात तरंगू लागले होते. ते चिखलातून काढताना शेतकरी कुटुंबाची दमछाक झाली. आर्थिक नुकसानी पेक्षाही पिकाची नासाडी झाल्याने शेतकरी मानसिकरित्या खचला आहे.  पालघर जिल्ह्यातील भात पीक क्षेत्र 76500हेक्टर असून त्यातील 93%लागवड झाली आहे म्हणजे 71308हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे 15हजार हेक्टर क्षेत्र डहाणू तालुक्यातील आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे . भात कापल्यावर काही दिवस रिमझिम पाऊस होता त्यामुळे आर्द्रतेचे वातावरण निर्माण झाले आणि भात शेतातील कडपावर रुजलं .थोडाफार हळवे जातीचे भात कापून घरी नेल्यामूळे काहीना आधार आहे .परंतु शेतातील भात दोन तीन उन्हं दिली तरी मिळालेल्या भातापासून मिळणारा तांदूळ हा खराब प्रतीचा व मोड झालेला असेल .कृषि विभाग आपल्या त्रिस्तरीय समिती(तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक ) मार्फत नुकसानीचे पंचनामे करीत आहे .तसेच विमाधारक  शेतकऱ्यांचे विमा प्रतिनिधि मार्फत पंचनामे सूरु आहेत . मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . मिळणारा पेंढा देखील गुरे खाणार नाही कारण तो काळा पडून त्यास कुजट वास येतोय .

बाईट:अजित माच्छीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.