ETV Bharat / state

प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, पालघर जिल्ह्यातील घटना

बारड डोंगरावरील जंगलात झाडाच्या फांदीला गळफास घेऊन डहाणूतील प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली आहे.

dahanu couple committed suicide In the forest at Barad
बारड येथील जंगलात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Feb 17, 2021, 8:17 PM IST

पालघर - डहाणू तालुक्यातील बारड डोंगरावरील जंगलात झाडाच्या फांदीला गळफास घेऊन डहाणूतील प्रेमीयुगलाने आत्महत्या केली आहे. योगेश मिठ्या निमला आणि संजना नथु आगरी अशी या आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

डहाणू तालुक्यातील बारड डोंगरावरील जंगलात योगेश मिठ्या निमला (वय २१, रा. वंकास) आणि संजना नथु आगरी (वय १९, रा. तलोटे) यांनी झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळ गाठून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ते मृतदेह आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी डहाणू पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा - राज्यात कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट घोटाळा; किरीट सोमैय्यांचा आरोप

हेही वाचा - Breaking : नालासोपाऱ्यातील मोरेगावमध्ये भररस्त्यात गोळीबार; 2 जण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.