ETV Bharat / state

महापालिका बसमध्ये प्रवाशांची गर्दी, कोरोनाचा धोका वाढला

वसई विरार महापालिकेची नव्याने परिवहन सेवा सुरू होऊन, तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अजूनही पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस अपुऱ्या आहेत. त्यामुळे कोरोनाकाळातही या बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बसमध्ये प्रवाशांची गर्दी
बसमध्ये प्रवाशांची गर्दी
author img

By

Published : Apr 10, 2021, 7:05 PM IST

पालघर - वसई विरार महापालिकेची नव्याने परिवहन सेवा सुरू होऊन, तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अजूनही पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस अपुऱ्या आहेत. त्यामुळे कोरोनाकाळातही या बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मागील वर्षी कोरोनाकाळात पालिकेची परिवहन सेवा बंद पडली होती. ती सेवा नवीन ठेकेदार नेमून जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. परंतु याला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी देखील पुरेश्या प्रमाणात बस उपलब्ध झालेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, कोरोना काळातही प्रवासी दाटीवाटीने प्रवास करत असल्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे.

बसमध्ये प्रवाशांची गर्दी

बसमध्ये प्रवाशांची गर्दी

वसई, विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी सुद्धा नियमावली लागू करण्यात आली आहे. रिक्षातून वाहतूक करताना दोन प्रवासी तर बसेसमधून प्रवास करताना क्षमतेपेक्षा ५० टक्केच प्रवासी घेऊन वाहतूक करावी असे आदेश जारी केले आहेत. असे असतानाही पालिकेच्या परिवहन बसमध्ये प्रवासी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी विरार ते शिरसाड या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढला

गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासन नियमावली लागू करते, परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. चाकरमानी व इतर सर्वसामान्य नागरिक हे पालिकेच्या बसेसचा वापर करतात. यामुळे प्रवाशांना पुरश्या बसेस उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने प्रवासी बसमध्ये गर्दी करतात. बसमधून दाटावटीने प्रवास केला जात असल्याने, कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. दरम्यान दुसरीकडे नियमानुसार प्रवास करण्याच्या सूचना चालक व वाहकांकडून प्रवाशांना केल्या जातात, मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहकांनी सांगितले.

बसची संख्या वाढवण्याची मागणी

वसई- विरार महापालिकेकडून टप्प्या- टप्प्याने ४३ मार्गावर बस सेवा सुरू केली जाईल, असे उद्घाटन प्रसंगी पालिकेच्या आयुक्तांनी सांगितले होते. परंतु तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी आतापर्यंत केवळ १३ मार्गावरच बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इतर ठिकाणी ये- जा करणाऱ्या प्रवाशांना अडचणी येत आहेत. ज्या मार्गावर बस सुरू करण्यात आल्या आहेत, त्यादेखील वेळवर येत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, बस वाढवण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा - फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लसीचा तुटवडा जाणवला नसता -उदयनराजे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.