पालघर (विरार): पुरोगामी महाराष्ट्रात काळीमा फासणारी धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. एका महिलेने कौटुंबिक वादातून आपल्याच जावेचा गर्भपात घडवून आणण्याचा आणि सासुला ठार मारण्याचा कट रचला. यासाठी तिने 'युट्यूब'वरील एका मांत्रिकाला 'गुगल पे'ने पैसे पाठविले. हे अघोरी कृत्य आणि जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार विरार जवळच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या प्रकरणी पतीनेच आपल्या पत्नी व विरुद्ध जादूटोणा कायद्या अंतर्गत मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पतीचा संशय बळावला आणि...: विरारच्या ग्रामीण भागात एका महिलेने तिचा पती तिच्या ताब्यात राहावा, जावेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला ठार करावे तसेच तिच्या सासुला हृदय विकारचा झटका येऊन ती मरावी, यासाठी गुगल व युट्यूबवर सर्च करून महिलेने एका मांत्रिकाचा नंबर मिळविला. यानंतर त्याच्याशी संपर्क केला. आपली पत्नी चोरून मोबाईल वापरत असल्याच्या संशयावरून पतीने बायको माहेरी गेल्यावर मोबाईलचा शोध घेतला. तेव्हा मोबाईलमध्ये धक्कादायक संभाषण सापडल्याने त्याला एकच धक्का बसला. यानंतर त्याने आपल्याच पत्नी विरोधात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ऑडिओ क्लिपच्या आधारे गुन्हा दाखल: युट्युबवर आपल्याला अनेक चांगल्या-वाईट गोष्टी सर्च केल्यावर मिळतात. त्यातील दाखवलेला व्हिडिओ कितपत सत्य आहे, हे प्रत्येकाने तपासून पहिले पाहिजे. काय घ्यावं आणि काय घेऊ नये हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. चांगले असेल तर चांगला परिणाम होतो. अन्यथा वाईट गोष्टी आत्मसात केल्यास तुरुंगात जाण्याची वेळ येते. त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नये. मांडवी पोलिसांनी ऑडिओ क्लिपच्या आधारे संबंधित महिलेवर महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
बाबाशी केलेले व्हाईस संभाषण पुढीलप्रमाणे आहे.
महिला: मुझे उसका मजा लेना है. घर पे ही बच्चा मार दो. आपने बोला था ४ हजार में हो जायेगा ना. आपने बोला था 4000 मे होगा, मै सात हजार कहा से लावू? पहिला काम करो, मै तुरंत पैसा पे करूंगी. विश्वास रखो फसाउंगी नही. तब तक उसकी डिलिव्हरी हो जायेगी.
महिला: अगले महिने में उसकी डिलिव्हरी है. इस 15 तारीख के पहिले उसका बच्चा मरना चाहिये. तब तक उसकी डिलीवरी हो जाएगी इतना टाइम नहीं है. फिर आप बोलेंगे टाइम खत्म हो गया.
महिला: देखती हूं यहां गांव से पेड़ नहीं होता है. शहर जाना पड़ता है. मैं पैसा पे करती हूं. लेकिन, मेरा पति मेरे वश मै होना मंगता है. पति का फोटो भेजती हूं.
असे वरील व्हाईस नोटमध्ये सापडले आहे. यावरून मांडवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा:
- Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना करणे भोवले; एकावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा
- Pune Crime : पुत्रप्राप्ती, भरभराटीसाठी अघोरी पूजा करणाऱ्यांवर कडक कारवाई करा- रूपाली चाकणकरांचे पोलिसांनाआदेश
- Turtle Puja Plan Thane धनलाभाच्या अंधश्रधदेतून कासवाची अघोरी पूजेचा जागृत नागरिकांमुळे डाव उधळला