पालघर (वसई /विरार) - शहरात सोमवारी पुन्हा ७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ४ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत वसई विरार शहरात कोरोना रुग्णांची संख्या १२५ इतकी झाली आहे.
सोमवारी आढळलेल्या कोरोनाबिधात रुग्णांचा आढावा -
नालासोपारा पूर्वेकडील २३ वर्षीय पुरुष असून तो मुंबई येथील रुग्णालयातील डायलेसीस टेक्नीशियन आहे. रुग्णावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विरार पश्चिमेकडील ३६ वर्षीय पुरुष असून मुंबई येथील रुग्णालयातील वॉर्ड अटेंडेन्ट आहे. रुग्णावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रुग्ण क्र. १२१- नालासोपारा पूर्वेकडिल ४३ वर्षीय पुरुष असून रुग्ण मुंबई येथील एका हॉटेल चा कर्मचारी आहे. रुग्णावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विरार पश्चिमेकडील २३ वर्षीय महिला असून त्या मुंबई येथील रुग्णालयातील नर्स आहेत. रुग्णास उपचारासाठी महापालिकेच्या वसई पुर्वेकडिल आयसोलेशन वॉर्ड मध्ये दाखल केले आहे.
विरार पूर्वेकडिल ३५ वर्षीय महिला असून त्या मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी आहेत. रुग्णास उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
विरार पश्चिमेकडील ५९ वर्षीय पुरुष असून ,उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
विरार पश्चिमेकडील ३० वर्षीय महिला असून त्या मुंबई येथील रुग्णालयातील नर्स आहेत. रुग्णास उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
चार रुग्ण करोना मुक्त -
यामध्ये विरार पश्चिमेकडिल ४२ वर्षीय पुरुष , २ नालासोपारा पश्चिमेकडील अनुक्रमे ३१ व ३६ वर्षीय पुरुष असे आहेत. तर नालासोपारा पूर्वेककडील एक पुरुष रुग्ण कोरोना मुक्त असून उपचारांना नंतर या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.