पालघर - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी वसई-विरारमध्ये १८९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील प्रशानाच्या चिंतेत भर पडली आहे.
गुरुवारी दिवसभरात ११६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचारादरम्यान ३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात १८९ रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ११ हजार ८३४ वर पोहोचली आहे.
वसई-विरारमध्ये आतापर्यंत एकूण २४२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर ७ हजार ७५८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ३ हजार ८३४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.
दिवसेंदिवस ग्रामीण भागातील बाधितांच्या संख्येत देखील भर पडत आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि डहाणू तालुक्यांमध्ये संस्थात्मक क्वारन्टाइन सेंटर वाढवण्याची मागणी होत आहे.