पालघर - वसई विरारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग येथील चाळींमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. तसेच चाळीचा रस्त्याला नदीत स्वरूप आल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.
मांडवी येथे १७८ एमएम तर आगाशी १५४ एमएम, निर्मळ १०९ एमएम, विरार १६० एमएम, माणिकपूर १६७ एमएम, वसई १४४ एमएम इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.
हेही वाचा - येत्या ७२ तासांत कोकण, मराठवाडा, विदर्भ अन् मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग येथील हनुमान मंदिर गल्लीमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधींकडून आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.