ETV Bharat / state

वसईत कारवाई पथकावर कंपनी कर्मचाऱ्यांचा हल्ला,जेसीबी वाहनचालक गंभीर जखमी - खाजगी कंपनीसमोरील अनधिकृत बांधकामावर कारवाई

वसईत खाजगी कंपनीसमोरील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका कर्मचारी पथकावर कंपनीच्या मॅनेजरने सहकाऱ्यांसोबत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत जेसीबीची तोडफोड करत वाहनचालकाला गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली आहे.

वसईत कारवाई पथकावर कंपनी कर्मचाऱ्यांचा हल्ला

author img

By

Published : Feb 1, 2021, 10:58 AM IST

पालघर - वसईत खाजगी कंपनीसमोरील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका कर्मचारी पथकावर कंपनीच्या मॅनेजरने सहकाऱ्यांसोबत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत जेसीबीची तोडफोड करत वाहनचालकाला गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी मॅनेजरसोबत सात ते आठ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाई दरम्यान पालिकेच्या पथकावर हल्ला
वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात वालीव प्रभाग समिती जी येथील सर्वे नंबर 62 येथील रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पालिका सहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम आपल्या कर्मचारी पथकासोबत गेले होते. यावेळी तेथील इन्टरटेक टेकनाॅलीज प्रा.लि.या कंपनीच्या गेटसमोरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हा कंपनी मॅनेजर अरूण मिश्रा याने सात ते आठ कर्मचाऱ्यांना सोबत घेत शिवीगाळ करत सहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम व कर्मचारी यांना धक्काबुक्की करायला सुरूवात केली. कंपनीतील लाकडी दांडके व लोखंडी राॅडचा वापर करत कारवाईसाठी आणलेल्या जेसीबीची तोडफोड करत वाहनचालक रमजान अली अब्दूलखान याला डोक्यात गंभीर मारहाण केली.

पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात सरकारी मालमत्तेचे नुकसान, सरकारी कामात अडथळा व मारहाण केल्या प्रकरणी अरूण मिश्रा, निरज पासवान, पुष्पराजा सिंग, सागर चव्हाण, सुबोध चंद्रसेन नागेन व इतर पाच ते सात जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

हेही वाचा - पहिल्यांदाच अर्थसंकल्प असणार डिजीटल स्वरुपात; ब्रीफकेसची परंपरा मोडीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.