पालघर - जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्रकिनारी पर्यटक पावसाळ्यात मोठ्या संख्येने येतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी 8 ऑक्टोबरपर्यंत नागरिक व पर्यटकांस मनाई करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले असून आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्रकिनार या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. यामुळे जर गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढू शकतो, त्यामुळे विविध कलमान्वये 11 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबरपर्यंत पालघर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 10 ऑगस्टला जारी केले आहेत.
या मनाई आदेशाचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.