ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू - blast in palghar

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया ऑरगॅनिक केमिकल्स या कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यावेळी कंपनीत 20 कामगार होते. यातील दोघांचा मृत्यू झाला असून 4 कामगार जखमी झाले आहेत.

blast in tarapur chemical factory
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 18, 2020, 9:56 AM IST

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया ऑरगॅनिक केमिकल्स या कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यावेळी कंपनीत 20 कामगार होते. यातील दोघांचा मृत्यू झाला असून 4 कामगार जखमी झाले आहेत.

blast in tarapur chemical factory
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया ऑरगॅनिक केमिकल्स या कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया केमिकल्स या कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर, चिंचणी व किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला असून स्फोटाच्या आवाजाने 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. स्फोटानंतर बोईसर पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. बचावकार्यादरम्यान गॅस गळती सुरू झाल्याने अग्निशमन दलाला काही वेळ अडथळा निर्माण झाला. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आले.
blast in tarapur chemical factory
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया केमिकल्स या कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला.
स्फोटानंतर कंपनीतून 20 पैकी 14 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र, या भीषण स्फोटात संदीप कुशवाहा, ग्रीजेश मौर्या या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर मोहम्मद मोहसीन अल्ताफ (30 वर्ष), दिलीप गुप्ता (28 वर्ष), उमेश कुशवाहा (22 वर्ष), प्रमोदकुमार मिश्रा (35 वर्ष) हे जखमी आहेत. जखमींवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कंपनीत डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल या रासायनिक उत्पादनाचे काम चालू असताना मिश्रणामध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डिस्टिलेशन चालू असताना रिॲक्टरचा दाब वाढून हा स्फोट झाल्याची माहिती कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग यांनी पोलिसांना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.