पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया केमिकल्स या कंपनीमध्ये आज (सोमवार) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगाराचा मृत्यू झाला असून, चार कामगार जखमी झाले आहेत. एक कामगार बेपत्ता असल्याचीही माहिती मिळाली आहे.
या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर, चिंचणी व किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला असून स्फोटाच्या आवाजाने १० किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. कंपनीतील रिॲक्टरमध्ये स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या स्फोटात संदीप कुशवाह या कामगाराचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा दुसऱ्या एका कामगाराचाही मृत्यू झाला आहे. मात्र, त्याचे नाव कळू शकले नाही. इतर चार कामगार जखमी झाले आहेत, तर एक कामगार बेपत्ता असल्याचे कळते. प्रमोद कुमार, मोहम्मद अल्ताफ , दीपक गुप्ता, उमेश कुशवा अशी जखमी कामगारांची झालेल्या चार नावे असून, या कामगारांवर सध्या बोईसर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
#UPDATE: Death toll rises to two in the fire incident at the factory of Nandolia Organic Chemicals in Palghar, Maharashtra. https://t.co/EJ9yjqXI7s
— ANI (@ANI) August 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE: Death toll rises to two in the fire incident at the factory of Nandolia Organic Chemicals in Palghar, Maharashtra. https://t.co/EJ9yjqXI7s
— ANI (@ANI) August 17, 2020#UPDATE: Death toll rises to two in the fire incident at the factory of Nandolia Organic Chemicals in Palghar, Maharashtra. https://t.co/EJ9yjqXI7s
— ANI (@ANI) August 17, 2020
बोईसर पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.