ETV Bharat / state

वाड्यात महायुतीचा लोकसभा निवडणुकीचा विजयोत्सव; जिल्हा कार्यालयात पेढे वाटून आनंदोत्सव - पालघर

पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला. तर, भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपील पाटील यांनी काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

वाड्यात महायुतीचा लोकसभा निवडणुकीचा विजयोत्स
author img

By

Published : May 24, 2019, 7:44 PM IST

Updated : May 24, 2019, 9:19 PM IST

वाडा/पालघर - देशभरात भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाले. या विजयाचा आनंद वाडा येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोलताशे आणि गुलालाची उधळण करत रॅली काढली.

पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला. तर, भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपील पाटील यांनी काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयाचा जल्लोष वाडा तालुक्यातील कुडूस येथेही भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साजरा केला.

वाडा/पालघर येथे भाजप-सेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

भाजपचे पालघर जिल्हा विस्तारक बाबाजी काठोले, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पाटील, तालुका अध्यक्ष संदीप पवार, शिवसेनेचे निलेश गंधे, निलेश पाटील, तुषार यादव, नगरसेविका, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी, कुडूस येथील सभापती अश्विनी शेळके, महिला बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी, उपसभापती मेघना पाटील, मंगेश पाटील, भगवान चौधरी उपस्थित होते.

पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा करण्यासाठी कार्यालयात दुपारपासूनच हजेरी लावली होती. यावेळी वाजत-गाजत मोठ्या जल्लोषात विजयाची रॅली वाड्यात फिरवण्यात आली. चौकात फटाकेही फोडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.

Intro:Body:

state news 01

Conclusion:
Last Updated : May 24, 2019, 9:19 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.