तारापूर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर या कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीतील कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, महिन्याभरापूर्वी याच कंपनीत अपघात झाला होता. यात दोन कामगार जखमी झाले होते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
हेही वाचा - मेळघाटात आढळणाऱ्या गोलाकार दगडांचे गूढ; स्थानिकांकडून केली जाते गोल्यादेवाची पूजा
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : 'ती' महिला हॉटेल ट्रायडेंट मधलीच, सूत्रांची माहिती