ETV Bharat / state

वाडा ग्रामीण रुग्णालयात बेबी कॉर्नरची स्थापना, गरोदर मातांसह बालकांना पुरवणार अत्याधुनिक सुविधा

रुग्णालयात बेबी कॉर्नर सुविधा केंद्रामुळे येथे शस्त्रक्रिया देखील होणार आहे. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नसल्याने येथे शस्त्रक्रिया होत नव्हती. मात्र, खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून ही सुविधा दिली जाणार असल्याची माहिती यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली.

wada rural hospital baby corner
वाडा ग्रामीण रुग्णालयात बेबी कॉर्नरची स्थापना
author img

By

Published : Jan 25, 2020, 7:57 PM IST

पालघर - जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयात महिला प्रसूतीगृहात बेबी कॉर्नर सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये बाळाची काळजी घेण्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा आणि महिलांसाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली आहे.

वाडा ग्रामीण रुग्णालयात बेबी कॉर्नरची स्थापना, गरोदर मातांसह बालकांना पुरवणार अत्याधुनिक सुविधा

वाडा ग्रामीण रुग्णालयात शहापूर, विक्रमगड, पालघर आणि मोखाडा भागातील बाहेरील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. तसेच गरोदर माता या रुग्णालयात प्रसूतीसाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी बेबी कॉर्नर सुविधा केंद्र उभारण्यात आले. यामध्ये गरोदर माता आणि तसेच तिच्या बाळांना सर्व वैद्यकीय सोईसुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच या केंद्रात नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सोईसुविधांमुळे बालमृत्यूमध्येही घट होणार असल्याची आशा केंद्राच्या उद्घाटनकर्त्या पालघर सिव्हील सर्जन कांचन वानेरे यांनी व्यक्त केली.

रुग्णालयात बेबी कॉर्नर सुविधा केंद्रामुळे येथे शस्त्रक्रिया देखील होणार आहे. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नसल्याने येथे शस्त्रक्रिया होत नव्हती. मात्र, खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून ही सुविधा दिली जाणार असल्याची माहिती यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली. यावेळी वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Intro:वाडा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक बेबी कॉर्नर 

सुविधा केंद्र सुरू,बालमृत्यूतही घट होणार

नाॅर्मल आणि सीझरींग सुविधा मिळणार 

पालघर(वाडा)संतोष पाटील

पालघर जिल्ह्य़ातील वाडा ग्रामीण रूग्णालयात महीला प्रसुतीगृहात बेबी कॉर्नर ही सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.या बेबी कॉर्नर सुविधा केंद्रात बाळाची काळजी घेण्यासाठी सुसज्ज असे यंञणा आणि  महीलेला वेगळे बेड रूम बनविण्यात आले आहेत.

या बेबी काॅर्नर केंद्रात नाॅर्मल आणि सीझरींग सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती आणि बेबी काॅर्नर काॅर्नरच्या केंद्राच्या उद्घाटनकर्त्या पालघर सिव्हिल सर्जन कांचन वानेरे यांनी बोलताना सांगितले. 
यावेळी वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक 
प्रदीप जाधव त्यांचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
वाडा ग्रामीण रुग्णालयात महीला प्रसृती गृहात बेबी काॅर्नर सुविधा केंद्र उभारून तालुक्यातील व इतर तालुक्यातील येणारे  महीला गरोदर मातांना व तीच्या बेबीला प्रसृती गृहात सर्व मेडिकल युक्त अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे. तसेच या अत्याधुनिक सोई सुविधांमुळे बालमृत्यूतही घट होणार असल्याचे मत कांचन वानेरे त्यांनी बोलताना सांगितले.

वाडा ग्रामीण रुग्णालयात शहापूर ,विक्रमगड,पालघर,आणि मोखाडा भागातील बाहेरील रूग्ण या ठिकाणी औषध उपचारासाठी येत असतात.
या ठिकाणी बेबी काॅर्नर सुविधा केंद्रामुळे येथे ऑपरेशन ही होणार आहेत.ग्रामीण रूग्णालयात स्ञीरोग तज्ञ व भुलतज्ञ नसल्याने येथे ऑपरेशन होत नव्हती मात्र खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून ही सुविधा दिली जाणार असल्याची माहिती यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली. 

Body:redy package voice over
byte
kanchan vanere civil serjon palghar

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.