पालघर - कोरोनाच्या महामारीत आशा स्वयंसेविका आपला जीव मुठीत घेऊन बाधित रुग्णांच्या परिसरात जाऊन सर्वे करत आहेत. यासाठी महापालिकेच्या आरोग्यविभाग जे कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना तीनशे रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला होता. मंजूर केलेले तीनशे रुपये काम केलेल्या आशांना मिळावे अशी मागणी पालिका आयुक्तांकडे आशा स्वयंसेविकांनी केली आहे.
तुटपुंज्या मानधनावर अशा स्वयंसेविका काम करत आहेत. पालिकेच्या डॉक्टरांनी आशांना सर्वेसाठी 300 रुपये दिले जातील असे सांगितले होते. मात्र ते आता मिळणार नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितल्याने आशा स्वयंसेविका नाराज झाल्या आहेत. त्यामुळे कामबंद करण्याचा इशारा आशांकडून देण्यात आला आहे. दरम्यान पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी तबस्सुम काझी यांनी तीनशे रुपयाचा प्रस्ताव जे स्वयंसेवक असतील त्यांच्यासाठी होता. आशा स्वयंसेविकांना शासनाकडून मानधन दिले जात आहे. मात्र यामध्ये बाईट देण्यासारखं काही नाही, असे सांगून त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.