पालघर (वसई) - वसई महापालिका परिवहन उद्घाटनाच्या कार्याकामात राडा घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर अविनाश जाधव व मनसे कार्यकर्त्यांनी तुळींज पोलीस ठाणे गाठले. व ताब्यात घेतलेल्या मनसे कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला. यावेळी कार्यकर्त्यांना अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारत त्यांनी पोलीस ठाण्यात राडा केला.
अविनाश जाधव व पोलीस अधिकाऱ्यात बाचाबाची-
यावेळी अविनाश जाधव व पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमात गोंधळ होणार असल्याचे आधीच गुप्त माहितीदारांमार्फत पोलिसांना समजल्याने मनसेच्या ३५ कार्यकर्त्यांना आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सकाळीच ताब्यात घेतले होते. मात्र काही कार्यकर्ते गपचूप कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले होते. भर कार्यक्रम सुरू असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांनी "आयुक्त साहेब वेळ द्या , वेळ द्या अशी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या गोंधळामुळे कार्यक्रमस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तातडीने बाहेर काढले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर मनसेचा तुळींज पोलीस ठाण्यात राडा-
वसई पोलीस ठाण्यातून निघाल्यानंतर ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे परिवहन सेवेच्या कार्यक्रमात राडेबाजी केलेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यास तुळींज पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलिसांनी आमचं आंदोलन उधळून लावण्यासाठी जवळपास ३५० कार्यकर्त्यांना विविध पोलीस ठाण्यात डांबून ठेवल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.
हेही वाचा- नागपूरच्या महापौरपदी भाजपाचे दयांशकर तिवारी बहुमताने विजयी