ETV Bharat / state

सरकारच्या प्रकल्पात भूमिपुत्रांवर अन्याय, आगरी सेनेचा काम बंद पाडण्याचा इशारा - Palghar Bullet Train and Corridor Project News

वसई तालुक्यात शासनाकडून प्रकल्पांची कामे जरी सुरू केली असली तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या विकलेल्या जमिनींचा योग्य तो मोबदला मिळाला नाही. शिवाय सुरू असलेल्या प्रकल्पामुळे गावातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे गावातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, सुरू असलेल्या प्रकल्पात स्थानिकांना न मिळणाऱ्या नोकऱ्या अशा विविध मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषद झाली. मागण्या मान्य न केल्यास प्रकल्पात सुरू असलेल्या बुलडोजर खाली जाऊन काम बंद पाडण्याचा इशाराही या वेळी दिला.

पालघर प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यूज
पालघर प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यूज
author img

By

Published : Nov 13, 2020, 2:08 PM IST

पालघर/विरार - पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्यात सुरू असलेल्या बुलेट ट्रेन व कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामात सरकार स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय करत असल्याचा आरोप आगरी सेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. सेनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी आंदोलनाचा इशाराही दिला.

सरकारच्या प्रकल्पात भूमिपुत्रांवर अन्याय, आगरी सेनेचा काम बंद पाडण्याचा इशारा

हेही वाचा - पहिला दिवा 'ती'च्या समोर ठेवून 'विचारांच्या दीपोत्सवाचा' अमरावतीत शुभारंभ

वसई तालुक्यात शासनाकडून प्रकल्पांची कामे जरी सुरू केली असली तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या विकलेल्या जमिनींचा योग्य तो मोबदला मिळाला नाही. शिवाय सुरू असलेल्या प्रकल्पामुळे गावातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे गावातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, सुरू असलेल्या प्रकल्पात स्थानिकांना न मिळणाऱ्या नोकऱ्या अशा विविध मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या मागण्या मान्य न केल्यास प्रकल्पात सुरू असलेल्या बुलडोजर खाली जाऊन काम बंद पाडण्याचा इशारा आगरी सेनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी दिला.

यावेळी प्रकल्पातील पंचक्रोशातील येणाऱ्या शिरगाव, खंदरपाडा, टाकपाडा, रायपाडा , कुंभारपाडा, वैतरणा, कसराळी, खाणीवडे, शिरसाड, भाताने आदी १५ ते २० गावांतील प्रकल्पबाधित शेतकरी आपल्या व्यथा मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भाजपचे शुक्रवारी 'चुन भाकर' आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.