ETV Bharat / state

Palghar News: आदिवासी खेळाडूची प्रशासनाकडून अवहेलना; रिव्हर राफ्टिंगचे स्वप्न अडकले लालफितीत..!

author img

By

Published : Feb 3, 2023, 2:01 PM IST

रिव्हर राफ्टिंग या साहसी खेळाला पालघर जिल्ह्यात रुजविण्याचे काम जगन झुगरे यांनी केले आहे. या पर्यटनातून आदिवासी तरुणांना रोजगार निर्माण करण्याचे स्वप्न त्यांने पाहिले होते. परंतु जगन झुगरे या आदिवासी राफ्टिंग खेळाडूला प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा सामना करावा लागत आहे. हा तरुण गेल्या कित्येक वर्षांपासून या भागात राफ्टींग सुरू करण्यासाठी झटत आहे. यासाठीची सर्व तयारी त्याने केली आहे. कर्ज काढून त्यांने सर्व सामानही खरेदी केला आहे. मात्र यासाठीची परवानगी लालफितीत अडकली आहे.

Palghar News
आदिवासी खेळाडूची प्रशासनाकडून अवहेलना

रिव्हर राफ्टिंगचे स्वप्न अडकले लालफितीत

पालघर : तालुक्यातील सायदे वाघ्याचीवाडी या काही शेकडा लोकसंख्या असलेल्या गावात ४० वर्षीय जगन रामा झुगरे राहतो. या तरुणाने निसर्गरम्य मोखाडा तालुक्यातील पावसाळ्यातील परीस्थिती पाहुन देश विदेशासारखा किंबहुना त्याहीपेक्षा सुंदर राफ्टिंग तालुक्यात होवू शकते याचा अभ्यास केला. मात्र हे करण्याआधी याची त्याला संपूर्ण माहिती असायला हवी म्हणून त्याने नेहरु माउंटींग उत्तर काशी याठिकाणी २००६ साली या राफ्टींग बोटींगचा कोर्स केला. यानंतर काही कर्ज काढून राफ्टींगसाठी लागणारी बोट लाईफजॅकेट खरेदी केले. याशिवाय काही गावातील तरुणांनाही याची ट्रेनिंग दिली.

परवानगीसाठी कागदपत्रांचा प्रवास सुरू : महाराष्ट्रात फक्त रायगड याठिकाणी असलेले राफ्टींग मोखाड्यात करण्याचे त्याचे प्रयत्न काही अंशी पूर्णही झाले. कारण निसर्गाने नटलेल्या तालुक्यात वैतरणा धरण ते सावर्डे गाव असा १६ किमीचा पाणी प्रवाह येथे आहे. यामध्ये अतिशय आनंद देणारे राफ्टींग होवू शकणार आहे असे त्याला वाटले. त्याची ट्रायलही त्याने केली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र जगनच्या या आनंदावर विरजन पडायला वेळ नाही लागला. कारण हे करण्यासाठी निसर्गाने जरी वरदान दिले असले तरी नियमांच्या कागदपत्रांची परवानगी मिळण्यात त्याला अडचणी आल्या. याला महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाची परवानगी लागते. हे जगनला उशिरा कळाले हेते. कारण प्रत्येक जिल्ह्यात पर्यटक साहसी समिती असते आणि अशा समितीची परवानगी राफ्टींगसाठी आवश्यक असते. यामुळे मग जगनचा कागदांचा प्रवास सुरू झाला. गेल्या दोन वर्षांपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाची तो उंबरठे झिजवत आहे.

प्रशासनाने करावी मदत : सरकारी अनास्थेच्या कारणास्तव कर्जबाजारी होवून सामान खरेदी केलेल्या जगनचे राफ्टींगचे स्वप्न अजूनही अपूर्णच राहिले आहे. राफ्टींगसाठी कितीतरी वेळा परदेशात किंवा देशात इतरत्र जाणाऱ्या पर्यटकांसाठी आपल्या जिल्ह्यात येणारी ही सुवर्णसंधी सरकारी कागदपत्रांच्या कचाट्यात सापडली आहे. कारण उत्तराखंड असेल की राफ्टिंगची विविध ठिकाणे या सर्वापेक्षा अधिक लांबीचा प्रवास महाराष्ट्रातील मोखाड्यात होणार आहे. यामुळे आता मोखाड्यावर आधीपासून लक्ष असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने जगनच्या जगण्याला बळ देण्यासाठी ईच्छाशक्ती दाखवून राफ्टींगचा प्रवास सुखकर करावा अशी अपेक्षा सर्व जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Bullet Train Boisar Station पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग 100 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.