पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीस तलासरी पोलिसांनी अटक आहे. आरोपीकडून एकूण 43 लाख 23 हजार 730 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तलासरी पोलिसांनी या प्रकरणी टेम्पो चालकाला अटक केली आहे. मुनावरअली मोहरमअली चौधरी (वय 25) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा कायदा 2006 नियम व नियमाने 2011 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अच्छाड चेकपोस्ट परिसरात पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यांना या टेम्पोमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. पोलिसांनी 25 लाख 23 हजार 730 रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा व 18 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 43 लाख 23 हजार 730 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.