ETV Bharat / state

माऊली संवाद यात्रा : पालघरमधील महिलांनी बांदेकरांसमोर वाचला समस्यांचा पाढा - Shivsena Secretary aadesh Bandekar

विक्रमगड तालुक्यातील महिलांनी कडी-कुर्झे गावातील मंदिर आणि स्मशानभूमी संदर्भातील समस्या बांदेकर यांच्या समोर मांडल्या.

आदेश बांदेकर
author img

By

Published : Aug 2, 2019, 9:25 PM IST

पालघर (वाडा) - शिवसेनेकडून आज (शुक्रवारी) जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी माऊली संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्यासमोर विक्रमगड तालुक्यातील महिलांनी येथील समस्यांचा पाढा वाचून दाखवला.

माऊली संवाद यात्रेत बोलताना आदेश बांदेकर

माऊली संवाद कार्यक्रम हा दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. कार्यक्रमात विक्रमगड तालुक्यातील महिलांनी कडी-कुर्झे गावातील मंदिर आणि स्मशानभूमी संदर्भातील समस्या बांदेकर यांच्या समोर मांडल्या. त्यानंतर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी ही समस्या दिवाळी अगोदर सोडवण्यात येईल, असे आश्वासन या महिलांना दिले. या मतदारसंघातील शिवसेनेत ३५ वर्ष काम करणाऱ्या एका महिला कार्यकर्तीने विक्रमगडमधील रस्ते, वीज आणि इतर अनेक समस्यांबाबत प्रश्न विचारले. यावेळी त्या ऐकणात म्हणून माईकचा ताबा बांदेकरांनी घेऊन शेवटी त्यांना ओरडून गप्प बसा, असे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, महिला आघाडी प्रमुख वैष्णवी रहाणे, तालुका प्रमुख सागर आळसी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी बांदेकरांनी होम मिनीस्टर कार्यक्रमासारखेच जमलेल्या महिलांना बोलते केले. त्यांना जाणवणारे प्रश्न मांडायला लावले.

Intro:
माऊली संवादातून भावोजींसमोर महीलावर्गानी वाचला समस्यांचा पाढा,मंदीर आणि स्मशानभुमीसाठी महीलावर्गाचे गा-हाणे
महीला कार्यकर्तीचा समस्येवर आक्रमकपणा पाहून बांदेकरांना कापरे भरले.महीलेला ओरडून गप्प केले.
पालघर (वाडा)-संतोष पाटील

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी माऊली संवादामार्फत विक्रमगड तालुक्याच्या समस्या जाणून घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन उपस्थित खासदार राजेंद्र गावित यांच्याकडून घेण्यात आले
हा दुपारी च्या 3.30 दरम्यान सुरू झाला. यावेळी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा,महीला आघाडी प्रमुख वैष्णवी रहाणे,तालुका प्रमुख सागर आळसी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड मतदारसंघातील समस्या जाणुन घेण्यासाठी माऊली संवाद आयोजित करण्यात आला होता.विक्रमगड तालुक्यातील कडी -कुर्झे गावातील मंदिर आणि स्मशानभुमी समस्या आदेश भावोजींसमोर मांडल्या तेव्हा पालघर लोकसभा खासदार यांच्या कडून दिपावली अगोदर ही समस्या सोडवू असे आश्वासन महीलांना देण्यात आले. ही समस्या एका स्थानिक व्यक्तीने अडविल्याचे महीलेने यावेळी सांगितले. तर विक्रमगड तालुक्यातील रस्ते, वीज समस्यांवर भर देण्यात आला. याच मतदारसंघातील शिवसेनेत 35 वर्ष काम करणाऱ्या एका महीला
कार्यकर्त्यानी भावोजींवर समस्यांचा भडीमार व शिवसेनेच्या कार्याचा उल्लेख करीत समस्या सांगण्याचे काम चालूच ठेवले .शेवटी त्या ऐकणात म्हणून माईकचा ताबा भावोजींवर घेण्याची वेळ आली त्या जणूकाही आंदोलन करत असल्याच्या अविर्भावात बोलत होत्या. शेवटी बांदेकर ओरडून त्यांना गप्पबसा असे सांगितले.
होम मिनीस्टर कार्यक्रमासारखेच जमलेल्या माऊलींना बोलते केले.

Body:ok

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.