पालघर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना विरार येथील महापालिकेत घातलेल्या राड्याप्रकरणी विरार पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. तडीपार का करण्यात येऊ नये, याबाबत बाजू ऐकूण घेण्यासाठी जाधव यांना विरार उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी, आपल्यावरील गुन्हे हे राजकीय असून आपल्याविरुद्ध षंडयंत्र होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
पालघर येथे जाधव यांना समर्थन देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. आपल्यावर दाखल असलेले गुन्हे हे राजकीय असून आपण खुनी, दरोडेखोर नसल्याचे जाधव यांनी सांगितले. तर, सुरू असलेल्या प्रकाराबाबत जाधव यांनी, ठाण्यातील एक बडा नेता षडयंत्र करत असल्याचा आरोप करून वेळ हा सगळ्यांचा संपतो आणि जेव्हा तुमचा वेळ संपेल तेव्हा तुमच्या घरातून तुम्हाला उचलू, असा हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा- डोळेबंद करून सर्वात जलद भाजी कापण्याचा विक्रम; पालघरच्या तरुणाची 'लिमका बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद