पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रंग रसायन कंपनीत शनिवारी रात्री दोनच्या सुमारास स्फोट होऊ भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांना काही तसांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
हेही वाचा - पालघर : उर्से गावात 49 वर्षांपासून एक गाव एक गणपती
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक एल 9/4 मधील रंग रसायन या कंपनीत शनिवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटनंतर कारखान्याला भीषण आग लागली. रंग तयार करणारा कारखाना असल्याने, ज्वलनशील द्रव्यांच्या साठ्यामुळे आगीने रौद्र स्वरूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व बोईसर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नाने ही आग तात्काळ आटोक्यात आली. कंपनीला सुट्टी असल्याने कोणताही कामगार दुर्घटनेच्या वेळी कंपनीत उपस्थित नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा - बांधकाम व्यवसायिक निशांत कदम यांची निर्घृण हत्या, मध्यरात्री ऑफिसला जाताना घडली घटना