ETV Bharat / state

Palghar Crime: खळबळजनक! खाजगी लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह

Palghar Crime: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये आढळला.

Palghar Crime
Palghar Crime
author img

By

Published : Dec 1, 2022, 10:25 AM IST

Updated : Dec 1, 2022, 10:39 AM IST

पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या खाजगी स्लीपर कोच बसमध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला आहे. या प्रवाशाला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचे घोषित केले आहे. घाटकोपर येथून निघालेली ही बस उदयपूर येथे जात असताना डहाणू तालुक्यातील चारोटी येथे ही घटना उघडकीस आली आहे.

प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात: स्लिपर कोच असणाऱ्या या बसमध्ये घोडबंदर येथे हा प्रवासी खाजगी बसमध्ये चढला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान डहाणू तालुक्यातील चारोटी नाक्याच्या पुढे लघवी करण्यासाठी काही प्रवासी बसमधून खाली उतरले असता, त्याच्या बुटाला रक्त लागल्याने शोध घेतल्याच्या प्रक्रियेत एक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. बस चालकाने त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी बस वळवली.

धारदार शस्त्राने वार केल्याचं उघडकीस: मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले. या इसमाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं उघडकीस आला आहे.त्याच्या खिशात काही ब्लेड सापडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून इसमाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं उघडकीस आला आहे. या सदर घटनेची माहिती कासा पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते.

आत्महत्येच कारण अजूनही अस्पष्ट: तपासात मृत तरुणांच नाव साईनाथ असे असून तो मूळचा मध्य प्रदेशचा असल्याचं उघडकीस आल आहे. मृत तरुणाच्या हातात धारदार ब्लेड आढळून आले आहे. त्याने स्वतःच आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या तरुणाकडे आणखी काही ब्लेड आणि एक लेडीज घड्याळ आढळून आले आहे. आत्महत्येच कारण अजूनही अस्पष्ट असल्याने, याबाबत कासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Dec 1, 2022, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.