पालघर - लॉकडाउनमुळे गुजरात समुद्रकिनारी अडकलेल्या महाराष्ट्रातील खलाशांना स्वगृही परत आणण्यास प्रशासनाला यश आले आहे. गुजरातमधील मांगरोल येथे अडकलेल्या ९३ खलाशांना तलासरी तालुक्यातील झाई जेटी येथे उतरविण्यात आले.
![palghar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-fishermenbackinpalghar-vis-byte-7204237_12042020203227_1204f_1586703747_1042.jpg)
जवळपास ९३ खलाशांना वेरावल कृपा या बोटीतून तलासरी तालुक्यातील झाई जेटीवर उतरविण्यात आले. त्यांना आदिवसी विकास प्रकल्पाच्या झाई आश्रमशाळेत क्वारंटाईन करण्यात आले असून या सर्वांची वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सुखरूप त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे. खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी आमदार पास्कल धणारे, डहाणू तहसीलदार राहुल सारंग, तलासरी तहसीलदार स्वाती घोगडे उपस्थित होत्या.
![palghar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-fishermenbackinpalghar-vis-byte-7204237_12042020203227_1204f_1586703747_295.jpg)