पालघर- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल ८५ रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
जिल्ह्यासोबत आता ग्रामीण भागाातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात तब्बल ग्रामीण भागात तब्बल ८५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५७ रुग्ण पालघर तालुक्यातील डहाणू, वाडा, विक्रमगडआणि वसई ग्रामीण भागातील आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ९११ इतकी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार १२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ७९५ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.