नालासोपाऱ्यात उघड्या गटारात पडून ६ वर्षीय चिमुकला गेला वाहून, शोधकार्य सुरू - अग्निशमन दल
नालासोपारा येथे 6 वर्षीय चिमुकला गटारीत पडल्याची घटना घडली.
पालघर - नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एक ६ वर्षाचा मुलगा उघड्या गटारात वाहून गेल्याची घटना घडली आहे. या मुलाचा शोध वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दल घेत आहे.
हेही वाचा- हरतालिका विसर्जन करताना चार जण नदीत बुडाले; एका महिलेचा मृत्यू तर 3 जण बेपत्ता
अबू बखर, असे या नाल्यात पडलेल्या मुलाचे नाव आहे. संतोष भुवन येथील मुख्य रस्त्यावर पाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे गटाराचे झाकण निघाले होते. त्यावेळी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास 6 वर्षाचा मुलगा गटारात वाहून गेला. या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. तर महानगरपलिकेच्या निष्काळजीपणामुळेच मुलगा गटारीत पडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Body:६ वर्षाचा मुलगा उघड्या गटारात वाहून गेला ;शोध कार्य सुरू नालासोपाराती घटना.
विपुल पाटील
पालघर / नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एक ६ वर्षाचा मुलगा उघड्या गटारात वाहून गेला असून त्याचा शोध वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान गटारात उतरून शोध घेत आहेत.संतोष भुवन येथील मुख्य रस्त्यावरील एका पाण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे गटाराचे झाकण निघाले होते संध्याकाळी ५.३० च्या सुमारास अबू बकर ६ वर्षाचा मुलगा गटारात वाहून गेला आहे त्याच्या शोधकार्याला सुरवात झाली असून महानगरपालिकेच्या निष्काळजीपणा मुळे मुलाचा जीव गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणं आहे.
या चाळीतील सर्वच गटारे पावसाच्या पाण्याने निघत असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे
Byte ...मुनिफा शेख (मुलाची आजी )
Byte ... नाजिया ( रहिवासी )Conclusion: