ETV Bharat / state

Mahavitaran Bill Pay Online Fraud : महावितरण कंपनीच्या नावाने बोईसर येथील एका व्यापाऱ्याला घातला पन्नास हजारांचा गंडा - महावितरणचा बिल भरण्याचा मॅसेज

पालघरमध्ये एका व्यापाऱ्याला लाईटबिल भरा अन्यथा आपला वीजपुरवठा आज रात्री खंडित (Mahavitran power disconnection message) करण्यात येईल असा मॅसेज आला. या व्यापाऱ्याचे लाईट बिल थकित असल्याने व्यापारी ऑनलाइन ठगाचा जाळ्यात (Mahavitaran Bill Pay Online Fraud) अडकला. ऑनलाइन पैसे भरण्यासाठी व्यापाऱ्याला एक ॲप्स डाऊनलोड करायला लावून पन्नास हजार रुपयांनी फसवणूक (rupees stolen from businessman bank account) केल्याची घटना बोईसर येथे घडली.

Mahavitaran Bill Pay Online Fraud
ऑनलाईन फसवणूक
author img

By

Published : Nov 22, 2022, 3:12 PM IST

पालघर/बोईसर : महावितरण कंपनीच्या नावाने बोईसर येथील एका व्यापाऱ्याला मॅसेज (Mahavitran bill payment message) पाठवत, आपले लाईटबिल भरा अन्यथा आपला वीजपुरवठा आज रात्री खंडित (Mahavitran power disconnection message) करण्यात येईल. या व्यापाऱ्याचे लाईट बिल थकित असल्याने व्यापारी ऑनलाइन ठगाचा जाळ्यात (Mahavitaran Bill Pay Online Fraud) अडकला. त्याला ऑनलाइन पैसे भरण्यासाठी एक ॲप्स डाऊनलोड करायला लावून पन्नास हजार रुपयांच्या चुना (rupees stolen from businessman bank account) लावल्याची घटना बोईसर येथे घडली आहे. latest news from Palghar, palghar news

बिल भरण्यासाठी मोबाईलवर आला मॅसेज- बोईसर ओसवाल येथील एक प्रसिद्ध कपड्याच्या व्यापाऱ्याला महावितरणच्या मॅसेज पाठवत थकलेले लाईट बिल भरा; अन्यथा रात्री १०:३० आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा मॅसेज ७५३००१५१०१ ह्या मोबाईल क्रमांकावरून दिनांक १२ नोव्हेंबर २२ रोजी दुपारी ४ वाजून ०२ मिनिटांनी ग्राहकाच्या मोबाईल वर पाठवला. बिलबाबत अधिक माहिती साठी ९७४९३४३६०७ ह्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आमच्या ऑफिसला संपर्क साधा, असे मॅसेजव्दारा सांगण्यात आले.

क्विक सपोर्ट ॲप्सच्या माध्यमातून चुना- ग्राहकाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता ग्राहकाला कोणीही प्रतिसाद दिला नाही.परंतु काही मिनिटांच्या आत त्याच नंबर वरून ग्राहकाला कॉल आला. तुमचे लाईट बिल थकले असून आज पुरवठा आज रात्री खंडित करण्यात येईल. ते भरायचे असेल तर ऑनलाइन प्रोसेस करून आत्ता आपण भरू शकतात असे सांगण्यात आले. व्यापाऱ्याचे १८३० रुपये लाईट बिल थकीत होते. वीज पुरवठा खंडित केला जाईल यामुळे व्यापारी घाबरला आणि ऑनलाईन बिल भरतो होकार दिल्यावर व्यापाऱ्याला क्विक सपोर्ट हे ॲप्स डाऊनलोड करायला सांगितले. क्विक सपोर्ट डाऊनलोड करून एक आय डी पाठविण्यात आला.ग्राहकाने तो आय डी टाकला आणि ग्राहक व्यापारी तिथेच फसला.

क्विक सपोर्ट ॲप्स स्क्रीन मिररचे काम - क्विक सपोर्ट हे ॲप्स स्क्रीन मिररचे काम करतो. आय डी नंबर टाकल्यावर समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणते ॲप्स उघतोय आणि काय करतोय हे त्याच्या स्क्रीनमध्ये दिसते. याचा फायदा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याने घेतला. क्विक सपोर्टनंतर त्या ठगने महावितरण ॲप्स डाऊनलोड करायला सांगितले. महावितरण ॲप्स वर जाऊन ग्राहक क्रमांक टाकला असता व्यापाऱ्याला त्याचे नाव आणि थकीत रक्कम दिसल्यावर त्याला कोणतीही शंका आली नाही. त्यानंतर व्यापारीने क्रेडिट कार्डव्दारा लाईट बिल भरण्याची प्रक्रिया सुरू केली.

सेकंदात 50 हजारांचा रक्कम गायब- ऑनलाईन ठग क्विक सपोर्ट च्या साहाय्याने व्यापारी काय करतोय हे पाहत असल्याने लाईट बिलची रक्कम भरण्यासाठी व्यापारी ने क्लिक केले असता, ऑनलाईन ठगा ने काही सेकंदात व्यापाऱ्याचा क्रेडिट कार्ड मधून ४९९९९ रुपये काढले. व्यापारी ला ४९९९९ चा मॅसेज आल्यावर आपण फसलो हे समजले. काही सेकंदात व्यापाऱ्याने क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आणि परत दोन मिनिटात व्यापाऱ्याला बँकेकडून मॅसेज आला की १५ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला गेला. व्यापारीने काही सेकंदात क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्याने बाकीची रक्कम उडवण्यात ठगाचा प्रयत्न फसला. परंतु पन्नास हजारांची रक्कम काही सेकंदात ऑनलाईन बिल भरण्याच्या नादात गमावली.

ओटीपी नंबर शेअर करणे पडले महागात - समाजात अशा घटना रोज ऐकायला मिळत असतात. बोईसरच्या व्यापारी प्रमाणे ऑनलाइन ठग आपली कधीही फसवणूक करू शकतात. आपण देखील त्यांच्या जाळ्यात फसून आपले देखील आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणतीही बँक आपल्याला एटीएम किंवा ओटीपी मागत नाही. ह्या प्रकरणात क्विक सपोर्ट ॲप्स स्क्रीन मिररचे करीत असल्याने या ॲप्सच्या साहाय्याने कोणताही OTP नंबर न मागता ग्राहकाला फसविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.