पालघर : नालासोपारा येथील पेल्हार परिसरात 4 दिवसांपूर्वी एका चोराला लोकांनी मारहाण करून ( thief beaten in Palghar ) जबर जखमी केले होते, हा व्हिडिओ आता ( victim on charges of theft ) व्हायरल होत आहे. चोरट्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी ५ जणांना ( Pelhar police on viral video ) अटक करण्यात आल्याचे पेल्हार पोलिसांनी सांगितले.
मारहाणीत चोर रक्तबंबाळ : नालासोपाराऱ्यात एका चोरट्याला नागरिकांनी बेदम चोप व अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पूर्व वाकणपाडा परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्यासाठी हा चोर चोरीचा प्रयत्न करत असताना त्याला नागरिकांनी पाहिले. आराडाओरड करून त्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. नागरिकांनी या चोराला इतकं मारले आहे की तो मारहाणीत रक्तबंबाळ झालेला पाहायला मिळत आहे. लाकडी बांबू, लाथा बुक्क्यानी शिवीगाळ करत नागरिकांच्या जमवाने या चोरट्याला अमानुष मारहाण केल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यामधून पाहायला मिळत आहे. या बाबतची माहिती पेल्हार पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या चोरट्याला त्याब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्या पाच ते सहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.