पालघर - वाडा तालुक्यातील जांभुळपाडा येथे शहापूर तालुक्यातील पिवळीहून वाड्याकडे येणाऱ्या बसला सकाळी 6. 45 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये 57 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील रामनवमी प्रसाद (वय 38) व सुमन प्रसाद (वय 35) दोघांना उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आले आहे.
जांभुळपाडा येथील स्पीड ब्रेकरवर ही जवळील शेतात गेली. त्यामुळे हा अपघात घडला. जखमींमध्ये शाळकरी मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील आणि वाडा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.