ETV Bharat / state

एक अनोखा सामुदायिक विवाह सोहळा; वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचा झिंगाट गाण्यावर तुफान डान्स - आदिवासी समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा

Community Marriage Ceremony : एखाद्या मुलीच्या बापाला आपल्या मुलीचं लग्न करायचं कसं? ही चिंता भेडसावत असते. मात्र पालघर येथील 'इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एयरपोर्ट' (Innerwheel Club of Bombay Airport) यांच्यावतीनं आदिवासी समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरत लग्न सोहळ्याचा आनंद लुटला.

Tribal Couples Community Wedding
अनोखा सामुदायिक विवाह सोहळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 6:39 PM IST

Updated : Dec 7, 2023, 12:24 PM IST

पालघर Community Marriage Ceremony : आपण वेगवेगळे शाही विवाह सोहळे पार पडताना पाहिले असतील पण पालघर धनसार येथील आनंद वृद्धाश्रम सेवा ट्रस्टने आयोजीत केलेला सामुदायिक विवाह सोहळा (Tribal Couples Community Wedding) जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 'इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एयरपोर्ट' च्या (Innerwheel Club of Bombay Airport) सोहळ्यात वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांनी गाजलेल्या सैराट सिनेमातील झिंगाट गाण्यावर तुफानी डान्स करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी तरुणांना लाजवेल असं नृत्य त्यांनी सादर केलं. या झिंगाट नृत्याचा व्हिडिओ (Zingaat Dance viral video) समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

वृद्धाश्रमात केला जातो सांभाळ : अनेकजण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात. वृद्धाश्रम म्हटलं की, परिवाराकडून सुश्रुषा होत नसलेल्या आई वडिलांना अखेर वृद्धआश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळं पारिवारिक कुठलही प्रेम मिळत नाही. त्यांना अनेक वेदना सहन कराव्या लागतात. या सर्व गोष्टीपासून त्याना कुठल्याही दुःखद वेदना सहन कराव्या लागू नयेत, याकरता वृद्धाश्रमात त्यांची परिवाराप्रमाणे सुश्रुषा करण्यात येते. अशाच प्रकारचे असलेले पालघरमधील 'आनंद आश्रम सेवा ट्रस्ट'मध्ये (AnandAshram Seva Trust) वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात.

चार जोडपी विवाहबद्ध : पालघरच्या वृद्धाश्रममध्ये आदिवासी समाजाचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्न सोहळ्यामध्ये चार जोडपी विवाहबद्ध (4 Tribal Couples Wedding) झाली. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांनीही झिंगाट गाण्यावर ठेका धरत लग्न सोहळ्याचा आनंद लुटला. तसंच उपस्थित वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. या कार्यक्रमाचे आयोजन 'इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट'च्या अध्यक्ष सुचेता रवेशिया, चेअरमन पल्लवी चोकसी, कमलिनी पारेख, कमला मेहता, डॉ. रूपा दोशी यांनी केलं होतं.

हे वाचलं का -

  1. Community Marriage Ceremony: असाही शाही विवाह शिर्डीत पार पडलाय; शिर्डीतील दाम्पत्याने केले 2250 मुलींचे कन्यादान
  2. नंदुरबार जिल्ह्यातील 70 जोडप्यांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न..
  3. येवल्यात 1 रुपयात लग्न, ११ जोडप्यांचे लागले लग्न

Last Updated : Dec 7, 2023, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.