ETV Bharat / state

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद नष्ट करण्यासाठीच ३७० हटवले- सुब्रम्हण्यम स्वामी

काश्मीरमध्ये इंटरनेट, दूरध्वनी सेवाही सुरू झाली असून दुकाने व शाळाही सुरू झाल्या आहेत आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सांगितले. त्याचबरोबर, कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये एकही गोळी चालली नसल्याचा दावाही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

dr. subramanian swamy
डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी
author img

By

Published : Mar 2, 2020, 9:37 PM IST

पालघर- ३७० कलम रद्द करणे हा भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानतर्फे सुरू असलेल्या दहशतवादाला नष्ट करण्याच्या दृष्टीने सुरू केलेला निर्णायक लढा आहे. यामुळे जम्मू-काश्‍मीर क्षेत्रात दीर्घकालीन शांती प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे, असे भाजपचे वरिष्ट नेता व खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया देताना डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी

शहरातील काँग्रेस कमिटी मैदान येथे रविवारी भाजप नेता व खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट हिंदुस्थान संगमतर्फे 'जागृत पालघर जागृत भारत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुब्रम्हण्यम स्वामी उपस्थितांना संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, शेख अब्दुल्ला यांना १७ वर्षे तुरुंगात काढावी लागली. मात्र, फारुख अब्दुल्ला यांना 17 महिने देखील तुरुंगात घालावे लागले नाही. ३७० कलम रद्द केल्याने जम्मू-काश्‍मीरमध्ये विपरीत परिणाम होतील, असे अनेकांनी सांगितले होते. आता काश्मीरमध्ये इंटरनेट, दूरध्वनी सेवाही सुरू झाली असून दुकाने व शाळाही सुरू झाल्या आहेत आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सांगितले. त्याचबरोबर, कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये एकही गोळी चालली नसल्याचा दावाही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

हेही वाचा- वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; भूमिकेवर ठाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.