ETV Bharat / state

ह्रदयद्रावक ! रेल्वेखाली एकाच घरातील 4 जणांनी घेतली उडी; तिघांचा मृत्यू, एक बचावली - नालासोपारा आत्महत्या न्यूज

नालासोपारमध्ये रेल्वेखाली येऊन एकाच घरातील चार जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोन महिलांसह एका पुरूषाचा मृत्यू झाला असून दहा वर्षीय चिमूकली गंभीर जखमी झाली आहे.

नालासोपारा
नालासोपारा
author img

By

Published : Dec 19, 2020, 12:29 PM IST

Updated : Dec 19, 2020, 7:08 PM IST

पालघर/वसई - नालासोपारमध्ये रेल्वेखाली येऊन एकाच घरातील चार जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोन महिलांसह एका पुरूषाचा मृत्यू झाला असून दहा वर्षीय चिमूकली गंभीर जखमी झाली आहे. लोहमार्ग पोलिसांना 10 वर्षीय चिमुरडी गंभीर अवस्थेत सापडली आहे. तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेखाली एकाच घरातील 3 जणांनी घेतली उडी; दोघांचा मृत्यू, एक बचावली

आर्थिक समस्येला कंटाळून संपूर्ण कूटूंबाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विरार पूर्व साईनाथ नगर येथे पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी, मुलगा ,मुलगी व नातीसह राहतात. शनिवारी सकाळी साडे पाच वाजता पोपट जंगम व्यतिरिक्त इतर चार जण घराबाहेर फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. त्यांनी थेट वसई ते नालासोपारा दरम्यान वसईच्या दिशेने जाणाऱया मालगाडीखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नंदा जंगम (55), प्रमिला जंगम (35), सोमनाथ जंगम (31) या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर समीक्षा खडतरे ही 10 वर्षांची चिमुकली मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या जखमी असलेल्या मुलीवर नालासोपारा येथील अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नालासोपारामध्ये रेल्वेखाली एकाच घरातील 4 जणांनी घेतली उडी

या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून तिन्ही मुतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. आर्थीक अडचणींतून या तिघांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा टोकाचा विचार केल्याचा प्राथमीक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कुटुंबाचा मसल्याचा व्यवसाय -

जंगम कुटुंबाचा मसाल्याचा व्यवसाय असून गेल्या चार दिवसांपासून धंदा होत नसल्यामुळे तसेच जागेच्या भाड्याचे 9000 रूपये देण्यापेक्षा आपण सर्व गावी जाऊ, असे मुलगा सोमनाथ जंगम म्हणत होता, असे सोमनाथचे वडील पोपट जंगम यांनी सांगितले. प्रकृती ठिक नसल्यामुळे आपण घरीच थांबलो होतो. मात्र, घराबाहेर पडताना एक हजार रूपये मुलाने दिल्याची माहिती त्यांनी दिली. मुलगा व पत्नी मसाल्याचा धंदा सांभाळत होते. तर मुलीला नवरा नांदवत नसल्यामुळे ती माहेरी होती. तीच्या डोक्यावरती परिणाम झाला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

यापूर्वीच्या घटना -

यापूर्वीही रेल्वेखाली येऊन अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील लोणीमध्ये एका महिलेने आपल्या नऊ महिन्याच्या चिमुकलीसह धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. तसेच गेल्या 6 नोव्हेंबरला जालना रेल्वे स्थानकात संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली होती. मृत व्यक्तीच्या शरीराचे अनेक तुकडे झाले होते. दरम्यान या व्यक्तीजवळ आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेले पत्रही पोलिसांना सापडले होते.

Last Updated : Dec 19, 2020, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.