पालघर : महाराष्ट्र शासनाच्या 'वन स्टेट वन इ चलान' ( One State One E Challan ) एप्रिल 2019 पासून संपूर्ण पालघर जिल्ह्यात कार्यामित झाला आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारक चालकावर इ चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत ( E Challan On Violator Traffic Rules) आहे. पालघर जिल्ह्यातील आतापर्यंत दंड न भरलेले वाहनधारक यांच्या चलनाची संख्या 75 हजार 16 इतकी असून त्या न भरलेल्या चलनाची रक्कम 3 कोटी 26 लाख 37 हजार इतकी आहे. सदरची रक्कम वाहनधारकाने राष्ट्रीय लोक अदालतमध्ये भरणा करावी असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले ( Traffic Police Department ) आहे.
रकम भरल्यास सुट : दंडाची रक्कम वाहनधारकांना एसएमएसद्वारे अनेक वेळा कळविण्यात आली. त्यांनी अजूनपर्यंत त्या रक्कमेचा भरणा केलेला नाही अशा वाहनधारकांना पुन्हा संधी देण्यासाठी विधी व न्यायधीकरण विभाग पालघर यांच्यामार्फत अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातून संबंधित ही चलन वाहनधारकांना एसएमएसद्वारे व नोटीसीद्वारे कळविण्यात आले आहे. न भरलेल्या इ चलन वाहनधारकाने रकमेचा खाली नमूद ठिकाणी भरणा करावा सदर अवधीमध्ये भरणा न केल्यास त्यांना प्राप्त एसएमएसद्वारे संदेशाप्रमाणे 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये हजर राहावे लागणार आहे. रकमेचा भरणा केल्यास हजर राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
रोख किंवा डेबिट कार्ड : रोख रक्कम रोख स्वरूपात अथवा डेबिट कार्ड द्वारे जिल्हा वाहतूक शाखा पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भरणा करता येईल किंवा जवळचे पोलीस ठाणे अथवा वाहतूक अंमलदार यांच्याकडे भरणा करता येईल वाहनावरील अनपेड दंड 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत पूर्वी भरावा तसेच कोणाला या मुदतीत दंड भरणे शक्य नसेल त्यांनी या दिवशी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये आपापले जवळील कोर्टात दंड भरावा वाहतूक नियमांचे पालनकरून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.