उस्मानाबाद - वन्यप्राण्यांमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. झरेगाव येथील विठ्ठल एडके यांच्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घातला. एडके यांच्या एक एकर शेतातील मक्याच्या पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले आहे.
विठ्ठल एडके यांची झरेगाव येथे गावालगत जमीन आहे. त्याचबरोबर त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. शेळ्यांना खाद्य होईल म्हणून त्यांनी मक्याची पेरणी केली होती. मात्र रानडुकरांनी शेतात हैदोस घातल्याने संपूर्ण मका जमीनदोस्त झाला आहे. विठ्ठल एडके यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
दरम्यान कोरोना विषाणूमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने मोठ्या उद्योगपतींपासून ते शेतकर्यांपर्यंत सगळेच मेटाकुटीला आले आहे. शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज, द्राक्षे यासह इतर फळपिके घेतली होती. मात्र, विक्रीअभावी सर्व मातीमोल झाले आहे.