ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ - विकत पाणी

शहराला गेल्या 2 महिन्यांपासून 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

उस्मानाबादमध्ये 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा
author img

By

Published : May 27, 2019, 7:19 PM IST

उस्मानाबाद - शहराला गेल्या 2 महिन्यांपासून 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणासह आणखी 4 पाणीपुरवठा योजनातून शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, सध्या उजनी पाणी पुरवठ्याव्यतिरिक्त इतर धारणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना पैसे खर्च करुन पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या शहरात टँकरच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे पाणी नागरिक विकत घेत आहेत.

उस्मानाबादमध्ये 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा

नगरपालिकेने गेल्या 3 ते 4 वर्षांपूर्वी उजनी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शहराला पाणी उपलब्ध करण्यासाठी व्यवस्था केली होती. मात्र, ही योजना सध्या तरी कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच रुईभर पाणीपुरवठा योजना, तेरणा पाणी पुरवठा योजना व शेकापूर तलाव पाणी पुरवठा योजना या 3 योजना प्रकल्प कोरडे पडल्यामुळे ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना विकतच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.

उजनी धरणातून 16 MLT पाण्याची पाईपलाईन केली आहे. मात्र, यातून आता फक्त 8 MLT पाणी येत आहे. तर शहरापर्यंत फक्त 5 MLT एवढेच पाणी पोहचत आहे. त्यामुळे शहरामध्ये 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक 500 लिटर छोटया टँकरसाठी 150 रुपये मोजून पाणी विकत घेत आहेत.

Intro:उस्मानाबाद येथे पाण्यासाठी दररोज लाखो रुपयांची उलाढाल

उस्मानाबाद शहराला गेली दोन महिन्यांपासून 15 ते 20 दिवसाआड पाणी मिळतंय त्यामुळे शहरवासीयांचे पाण्यावाचून हाल सुरू आहे शहराला सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून पाणी पुरवठा होतो तर उजनी पाणी पुरवठा योजनेसह शहरासाठी आणखी चार पाणीपुरवठा योजना आहेत मात्र सध्या उजनी पाणी पुरवठा व्यतिरिक्त सर्वच धारण कोरडे पडले असून शहरातील नागरिकांना दररोज पाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागत आहे. शहरात शेकडो टँकरच्या माध्यमातून शहरात दररोज लाखो रुपयांचे पाणी विकत घेऊन पैश्याबरोबर पाण्याची देखील उलाढाल होत आहे उन्हाळ्याच्या कडक वातावरणामुळे शहराला पाणी मिळणे अशक्य झाले आहे. नगरपालिकेने गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी उजनी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शहराला पाणी उपलब्ध करण्यासाठी व्यवस्था केली होती मात्र ही योजना सध्या तरी कुचकामी ठरल्याचे दिसत आहे यासोबतच रुईभर पाणीपुरवठा योजना तेरणा पाणी पुरवठा योजना व शेकापूर तलाव पाणी पुरवठा योजना या तिन्ही योजना केवळ प्रकल्प कोरडे पडल्यामुळे ठप्प झाले आहेत यामुळे शहरातील नागरिकांना केवळ पिण्याच्या पाण्यासाठी विकतच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.
उजनी धरणातून 16 MLT पाण्याची पाईपलाईन केली आहे मात्र यातून आता पर्यंत 8 MLT येत आहे मात्र शहरात फक्त 5 MLT पोहचते मात्र तरीही शहरातील लोकांना 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे त्यामुळे लोकांना खिशाला कात्री लावून पाणी विकत घ्यावे लागत आहे 500 लिटर च्या छोटया टँकर साठी 150 रुपये मोजावे लागतात आहेत यामुळे नागरिकांना आपला खिसा दररोज करिता करावाBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.