ETV Bharat / state

काँग्रेसने आमचा जाहीरनामा चोरला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - काँग्रेस 'चोर' तर भाजप 'डाकू

काँग्रेसने आमचा जाहीरनामा चोरला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडवर यांनी केला आहे. तुळजापूर येथील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, भाजपवर जोरदार टीका केली.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Oct 14, 2019, 12:38 PM IST

उस्मानाबाद - वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कॉपी केला आहे, असा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. तसेच काँग्रेस चोर तर भाजप हे डाकू असल्याची टीकाही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीची रविवारी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली.

काँग्रेस 'चोर' तर भाजप 'डाकू' - प्रकाश आंबेडकर

हेही वाचा - 'कलम 370 निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'

पुढे बोलताना ते म्हणाले, यानंतर तर पुन्हा भाजपची सत्ता आली तर आणखी सहा बँका बंद पडतील. तसेच खोपोली परिसरातील टाटा धरणातील पाणी विजेसाठी न वापरता 5 टीएमसी पाणी उजनीत आणता आले असते. मराठवाडा दुष्काळ मुक्त करता आला असता. मात्र, सरकारमध्ये नियोजनाचा अभाव दिसतो. धरण टाटाची जरी असले तरी पाणी कोणाच्या मालकीचे नसते. सरकारला पाणी कोठेही वापरता येते.

यासाठी निर्णय घेण्याची ताकत महत्त्वाची आहे. म्हणून आम्हाला सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तुळजापूर विधानसभेचे उमेदवार अशोक जगदाळे, उमरगा लोहाराचे उमेदवार रमाकांत गायकवाड आणि उमेदवार चंद्रशेखर गायकवाड यांच्यासह अर्जुन सलगर यांच्यासह समर्थक उपस्थित होते.

Intro:वंचितचा लोकसभेचा जाहीरनामा काँग्रेसने विधानसभेच्या निवडणूकिसाठी कॉपी केला

उस्मानाबाद- वंचित बहुजन आघाडीची आज तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे हे सभा घेण्यात आली या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजपा वरती सडकून टीका केली कॉंग्रेस चोर आहे व भाजपा डाकू असल्याची टीका केली त्याचबरोबर जर यानंतर भाजपाचे सत्ता आली तर आणखी सहा बँका बंद पडतील असे भाकीतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले तर पाणीप्रश्नावरती प्रकाश आंबेडकर बोलत असताना म्हणाले की खोपोली परिसरातील टाटाच्या 5 धारणातील पाणी विजेसाठी न वापरता 5 टीएमसी पाणी उजनीत आणता आलं असत आणि मराठवाडा दुष्काळ मुक्त करता आला असता परंतु सरकारमध्ये नियोजनाचा अभाव दिसतो,धरण टाटाची जरी असले तरी पाणी कोणाच्या मालकीचे नसत सरकारला पाणी कोठेही वापरता येत,निर्णय घेण्याची ताकत महत्त्वाची आहे,यासाठी सत्ता आपल्याकडे असायला हवी तरच आस्वासन पूर्ती होईल यासाठी सत्ता लागते,सत्ता दिली तर कुणाला ही वंचित ठेवले जाणार नाही असे सांगितले, यावेळी तुळजापुर विधानसभेचे उमेदवार अशोक जगदाळे,उमरगा लोहाराचे उमेदवार रमाकांत गायकवाड व उमेदवार चंद्रशेखर गायकवाड यांच्यासह अर्जुन सलगर यांच्या सह वंचित समर्थकांची उपस्थिती होती.Body:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.