उस्मानाबाद - जिल्ह्यातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. जिल्ह्यातील उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील शिराढोण, गोविंदपूर, खामसवाडी या गावामध्ये गारांचा मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने याचा शेतीला मोठा फटका बसला आहे.
सध्या रब्बीचे पिके काढण्याचे दिवस आहेत. ज्वारी, गहू, हरभरा यासह शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेलेी फळ पिके अंबा, मोसंबी, द्राक्ष हेदेखील पिके आहेत. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईला सामोरे जात होता. त्यात ऐकीकडे कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव निर्माण झाला आहे. तर, आता शेतकऱ्यांपुढे हे अवकाळी संकट निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी राजा मात्र पुरता हतबल झाला आहे.